कत्तलीसाठी नेणारी २१ जनावरे गोशाळेस सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:47+5:302021-07-24T04:10:47+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिवारात कत्तलीसाठी वाहतुकीचे नियोजन आखून बांधलेल्या स्थितीतील जप्त २१ जनावरे न्यायालयाच्या आदेशान्वये वणीच्या गोशाळेत ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिवारात कत्तलीसाठी वाहतुकीचे नियोजन आखून बांधलेल्या स्थितीतील जप्त २१ जनावरे न्यायालयाच्या आदेशान्वये वणीच्या गोशाळेत सुपूर्द करण्यात आली आहेत. खेडगाव शिवारातील एके ठिकाणी २१ जनावरे बांधून ठेवण्यात आली असून त्यांना कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना गोपनीयरित्या मिळाली. त्या आधारे पथकाने या ठिकाणी धाड टाकली असता २१ जनावरे बांधलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. तपासाअंती सदरची जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पुढे आली. संबंधित संशयितांवर भारतीय प्राण्यांचा छळ प्रतिबंधित अधिनियम व प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तद्नंतर या गुरांची देखभाल गोशाळेत (पांजारपोळ) वणी येथे करण्यासाठी न्यायालयात याबाबत प्रक्रिया करण्यात आली.