२१ फुटी मांगल्य गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:21 IST2020-08-04T23:28:57+5:302020-08-05T01:21:20+5:30
नाशिक : अयोद्धेतील मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्वत्र श्रीरामांचा जागर होत असताना नाशिकमध्येदेखील हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी नाशिकनगरी सज्ज झाली आहे.

२१ फुटी मांगल्य गुढी
ठळक मुद्देशौनक गायधनी यांच्या संकल्पनेतून या गुढीची संकल्पना आकारास आली आहे.
नाशिक : अयोद्धेतील मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्वत्र श्रीरामांचा जागर होत असताना नाशिकमध्येदेखील हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. भूमिपूजनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी नाशिकमध्ये ऊर्जा संचलित सहस्त्रनाद वाद्यपथकांच्या वतीने २१ फुटी गुढी उभारण्यात आली आहे. पंचवटीतील कपालेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या शौनकाश्रम येथे भव्य गुढी उभारण्यात आली आहे. अमी छेडा आणि शौनक गायधनी यांच्या संकल्पनेतून या गुढीची संकल्पना आकारास आली आहे.