गुदामातून २१ बोकड पळविणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 01:17 AM2021-03-22T01:17:51+5:302021-03-22T01:18:10+5:30

सातपूर भागातील एका मटणविक्री करणाऱ्या दुकानाजवळील गुदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८४ हजार रुपयांचे २१ लहान-मोठे बोकड गायब केल्याची घटना बुधवारी (दि.१७) उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत.

21 goat smugglers arrested | गुदामातून २१ बोकड पळविणारा ताब्यात

गुदामातून २१ बोकड पळविणारा ताब्यात

Next
ठळक मुद्देमुंब्र्यामधून बांधल्या मुसक्या : बोकडांच्या चोरीसाठी इनोव्हाचा वापर

नाशिक : सातपूर भागातील एका मटणविक्री करणाऱ्या दुकानाजवळील गुदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८४ हजार रुपयांचे २१ लहान-मोठे बोकड गायब केल्याची घटना बुधवारी (दि.१७) उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून या गुन्ह्यातील २१ व अन्य पाच असे एकूण २६ बोकडांची सुटका करत ते पोलिसांनी जप्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी, गुदामाचे कुलूप तोडून चोरट्याने गुदामातील ८४ हजार रुपयांचे २१ बोकड चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१८) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी इनोव्हा कारमधून (एम.एच०२बीजे २२४५) बोकड लांबविल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी गुन्हे शाेध पथकाला आदेशित करत गुन्ह्याचा छडा लावण्यास सांगितले.  पोलिसांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत तपास चक्रे फिरविली. पोलिसांनी घोटी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तेथून मुंबईच्या दिशेने वरील क्रमांकाची कार जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. यामुळे चोरटे मुंबईच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले होते. 
१ लाख ९ हजार किमतीचा मुद्देमाल
n पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण शाखेची मदत घेत मोबाइल क्रमांक ट्रेस करत  मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने मुंब्रा गाठले. तेथून संशयित आसिफ रशीदउल्ला कुरेशी (३५, रा. खर्डीरोड, मुंब्रा) यास ताब्यात घेतले. पथकाने आसिफ याची कसून चौकशी केली असता कारमालक ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील असल्याचे समजले. 
nपोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने सातपूर येथून बोकड चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे १ लाख ९ हजार रुपये किमतीचे २६ बोकडही जप्त केले आहेत.

Web Title: 21 goat smugglers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.