लोहोणेर ग्रामपंचायतीवर २१ लाखांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:12 AM2018-05-16T00:12:53+5:302018-05-16T00:12:53+5:30
लोहोणेर : ग्रामपंचायतीने गावातील पथिदप संदर्भातील मागील व चालू थकबाकी वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने गावातील पथदीप जोडणी तोडल्याने गावातील पथदीप तीन दिवसांपासून बंद असल्याने गावात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे.
लोहोणेर : ग्रामपंचायतीने गावातील पथिदप संदर्भातील मागील व चालू थकबाकी वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने गावातील पथदीप जोडणी तोडल्याने गावातील पथदीप तीन दिवसांपासून बंद असल्याने गावात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे.
ग्रामपंचायतीच्या पथदीप दिवाबत्तीची थकबाकी व चालू बिलाची सुमारे २१ लाख ३१ हजार ११० रूपयांची इतकी मोठी रक्कम थकलेली आहे. सदर थकबाकी संदर्भात महावितरण कंपनीने लोहोणेर ग्रामपंचायतीस कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ थकबाकी सह वीजिबल पाठवून गावातील पथदिपचापुरवठा खंडीत केला आहे. ग्रामपंचायतीकडे याबाबत विचारणा केली असता पथदिप वीजिबल हे आतापर्यत जिल्हा परिषदने परस्पर भरणा केले आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे अद्याप कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नाही. ग्रामपंचायतीस बिल आल्यास एवढी मोठी रक्कम दरवेळेस कशी उभी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे . सदर बिल हे आता पर्यत जिल्हा परिषदेच्यावतीने भरणा केले जात होते. मात्र आता शासनाने सदर ग्रामपंचायतीने स्वनिधी अथवा चौदावा वित्त आयोग किंवा इतर उपलब्ध निधीतून सदर भरणा करावा असे परिपत्रक काढले आहे. यासाठीच्या तरतुदी बाबत व लोहोणेर ग्रामपंचायतीस उपलब्ध होणारा शासकीय निधी व संभाव्य येणारे सुमारे एक महिन्याचे लाईट बिल याचा मेळ घालण्यात ग्रामपंचायतीला नाकीनऊ येणार आहे. यामुळे सदर रक्कमेचा भरणा कसा करावा असा प्रश्न सध्यातरी लोहोणेर ग्रामपंचायतीपुढे निर्माण झाला आहे.
गावातील स्ट्रीट लाईट ( पथदीप) संदर्भात थकबाकीसह मोठ्या रक्कमेचे बिल महावितरण कंपनीच्यावतीने ग्रामपंचायतीस देण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने लोहोणेर गावातील स्ट्रीट लाईटची जोडणी खंडित करण्यात आली. ही बाब योग्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम कशी भरावयाची असा प्रश्न निर्माण झाला आहे
- जयवंता बच्छाव, सरपंच, ग्रामपंचायत लोहोणेर
लोहोणेर ग्रामपंचायतीने स्ट्रीट लाईट संदर्भातील बिलाच्या रक्कमेचा भरणा न केल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेल्या आदेशानुसार विजजोडणी खंडित करण्यात आली आहे.
- एम. एस. चव्हाण, सहाय्यक अभियंता, वीज वितरण कंपनी, उपविभाग लोहोणेर
लोहोणेरसह माळवाडी, फुले माळवाडी, सावकी, खामखेडा, पिळकोस, ठेंगोडा आदी ग्रामपंचायतीच्या पथदिपाची जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरण कंपनीच्या वतीने देण्यात आले आहेत. सदर ग्रामपंचायतीना भरणा करणे शक्य नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारीशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.
- धनश्री आहेर, जि. प. सदस्य लोहोणेर गट