सातपूर-पश्चिम विभागातील धार्मिक स्थळांवर कारवाई२१ अनधिकृत बांधकामे हटवली : किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:14 AM2017-11-10T00:14:16+5:302017-11-10T00:15:24+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि.९) सातपूर आणि पश्चिम विभागातील २१ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली. किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली.

21 unauthorized constructions removed from religious places in Satpur-West division: Except minor opposition | सातपूर-पश्चिम विभागातील धार्मिक स्थळांवर कारवाई२१ अनधिकृत बांधकामे हटवली : किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत

सातपूर-पश्चिम विभागातील धार्मिक स्थळांवर कारवाई२१ अनधिकृत बांधकामे हटवली : किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत

Next
ठळक मुद्दे विश्वस्तांनी न्यायालयात जाण्याची तयारी चालविली धडक कारवाईला सुरुवातधार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त

सातपूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि.९) सातपूर आणि पश्चिम विभागातील २१ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली. किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली. दरम्यान, महापालिकेच्या या मोहिमेमुळे धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी पंचवटी, नाशिक पूर्व विभागातील काही विश्वस्तांनी न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि.८) सिडको विभागापासून महानगरपालिकेच्या अतिक्र मण विरोधी पथकाने धडक कारवाईला सुरुवात केली. गुरुवारी (दि.९) सातपूर विभागात सकाळी ९ वाजता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. मोहीम सुरू करण्यापूर्वी सातपूर पोलीस ठाण्यात मोहिमेतील पोलिसांचा फौजफाटा हजर झाला. महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मोहिमेचा आराखडा तयार केला. सुरुवातीला पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याच्या कडेला असणारी दोन धार्मिक स्थळे हटवून ही मोहीम महादेववाडीत गेली. तेथील दोन धार्मिक स्थळे हटविण्यात आली. त्यानंतर सातपूर कॉलनीत श्री छत्रपती विद्यालयालगतची तीन धार्मिक स्थळे, श्री सप्तशृंगी मंदिराजवळील दोन धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई पार पाडण्यात आली. जुन्या कॉलनीतील दोन धार्मिक स्थळे आणि श्रमिकनगर येथील एक धार्मिक स्थळ अशी एकूण १२ धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. धार्मिक स्थळांमधील मूर्ती काढण्यापूर्वी पुरोहिताच्या माध्यमातून विधिवत पूजन करून घेण्यात आले. त्यानंतर मूर्ती संबंधितांच्या हवाली करण्यात आली. दोन-तीन ठिकाणी झाडाखाली देवदेवतांच्या फोटोफ्रेम ठेवण्यात आल्या होत्या. त्या सुद्धा मोहीमेदरम्यान काढून घेण्यात आल्या. बहुतांश धार्मिक स्थळे हटविण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून सहकार्य केले. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने मोहीम शांततेत पार पडली. पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अतिक्र मण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

Web Title: 21 unauthorized constructions removed from religious places in Satpur-West division: Except minor opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.