जिल्ह्यातील २१ हजार मतदार अजूनही छायाचित्राविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:37+5:302021-03-29T04:09:37+5:30
नाशिक : जिल्ह्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी जिल्हा पातळीवर व्यापक मोहीम राबविण्यात आली आहे. जास्तीत जास्त अचूक मतदार यादी तयार ...
नाशिक : जिल्ह्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी जिल्हा पातळीवर व्यापक मोहीम राबविण्यात आली आहे. जास्तीत जास्त अचूक मतदार यादी तयार व्हावी यासाठी छायाचित्र मतदार यादीची मोहीम राबविण्यात येऊनही जिल्ह्यात अजूनही २१,५४६ मतदार हे छायाचित्राविना आहेत. मतदार यादीत छायाचित्र देण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेला दोनदा मुदतवाढ देऊनही मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. अशी नावे मतदार यादीतून काढून टाकले जाण्याचीदेखील शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी अद्ययावतीकरणाची मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये मयत आणि दुबार नावे वगळण्यात आली असून, अंतिम मतदार यादीदेखील जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही २१हजारांपेक्षा जास्त मतदारांनी आपली छायाचित्रे दिलेली नसल्याने त्यांचे मतदार यादीतील नावे छायाचित्राविना आहे.
बोगस मतदान तसेच बोगस नावे टाळण्यासाठी राज्य पातळीवर मोहीम राबविण्यात आली. नाशिकमध्येदेखील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच अधिकाऱ्यांवर जबाबादारी निश्चित करून मतदारसंघनिहाय मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेच्या कक्षातदेखील यादी अद्ययावतीकरणासाठी व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांनी आपल्या यादीतील अद्ययावतीकरणासाठी संपर्क मोहीमही राबविण्यात आली. मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. काही सुज्ञ मतदारांनी आपली जबाबदारी पार पाडली असली तरी सुमारे २१ हजार मतदारांनी अजूनही छायाचित्र दिले नसल्याने त्यांच्या मतदार यादीतील नावासमोरील फोटोचा कॉलम रिकामा राहिलेला आहे.
===Photopath===
280321\28nsk_11_28032021_13.jpg
===Caption===
जिल्ह्यातील २१ हजार मतदार अजूनही छायाचित्रविना