कोयत्याचा धाक दाखवून २१ हजारांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 08:39 PM2021-02-24T20:39:35+5:302021-02-25T01:29:31+5:30

पंचवटी : दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवकांना तिघा संशयित लुटारुंनी भररस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातून मोबाइल व पाचशे रुपये असा २१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवनात घडली आहे.

21,000 were robbed out of fear of being stabbed | कोयत्याचा धाक दाखवून २१ हजारांना लुटले

कोयत्याचा धाक दाखवून २१ हजारांना लुटले

Next
ठळक मुद्देतपोवन : तीघा संशयितांकडून दुचाकीस्वारांची जबरी लूट

पंचवटी : दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवकांना तिघा संशयित लुटारुंनी भररस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातून मोबाइल व पाचशे रुपये असा २१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवनात घडली आहे.

याबाबत पंचक द्वारकानगर परिसरात राहणाऱ्या हेमंत गाडे याने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी तक्रारदार गाडे व त्याचा मित्र आशिष कापसे असे दोघेजण दुचाकीवरून तपोवन मलशुद्धीकरण केंद्र

येथून जात असताना हिरोहोंडा पॅशनवरून (एमएच१५-एफझेड ९८९५) आलेल्या तिघांनी दुचाकी थांबवून बेदम मारहाण करून हातातील धारदार कोयत्याचा धाक दाखवून दोघांच्या खिशातून दोन मोबाइल व पाचशे रुपये काढून घेतले.
कधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न तर दुसरीकडे तपोवनात भरदिवसा लुटमारीची घटना यामुळे आडगाव पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: 21,000 were robbed out of fear of being stabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.