राष्ट्रीय लोकअदालतीत २१४२ प्रकरणे निकाली
By admin | Published: July 10, 2017 12:07 AM2017-07-10T00:07:13+5:302017-07-10T00:07:26+5:30
नाशिक : राष्ट्रीय लोकअदालतीत २ हजार १४२ खटले निकाली काढण्यात आले़,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे शनिवारी (दि़८) जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आलेल्या न्यायालयातील प्रलंबित व दावा दाखलपूर्व १९ हजार ६२२ प्रकरणांपैकी २ हजार १४२ खटले निकाली काढण्यात आले़, तर प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांतील दूरध्वनी कंपनी, वाहतूक पोलीस, बँक वसुली व मोटार अपघात, धनादेश न वटणे आदी प्रकरणांमध्ये पाच कोटी ५४ लाख ८५ हजार ४२५ रुपयांची नुकसानभरपाई व दंडवसुली करण्यात आली़ या लोकअदालतीचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ शर्मा यांच्या हस्ते झाले़ प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़ एम़ बुक्के यांनी केले़ जिल्हा न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी लोकअदालतीचे महत्त्व विशद केले़ मुख्य न्यायदंडाधिकारी एस़ टी़ डोके यांनी आभार मानले़ लोकअदालतीमधील दावे व प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये विविध पॅनल्स तयार करण्यात आले होते़