जिल्ह्यातील २१५ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:41 AM2020-12-04T04:41:22+5:302020-12-04T04:41:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत गुरुवारी (दि.३) नवीन ३०२ रुग्णांची भर पडली असून, २१५ रुग्ण ...

215 patients in the district are corona free | जिल्ह्यातील २१५ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यातील २१५ रुग्ण कोरोनामुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत गुरुवारी (दि.३) नवीन ३०२ रुग्णांची भर पडली असून, २१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४, तर नाशिक शहरात ५ याप्रमाणे एकूण ९ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या १,८१३वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २ हजार १२४ वर पोहोचली असून, त्यातील ९७ हजार २११ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३,१०० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.१९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.२२, नाशिक ग्रामीणला ९३.२६, मालेगाव शहरात ९२.९१, तर जिल्हाबाह्य ९२.२५ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,१०० बाधित रुग्णांमध्ये १६२८ रुग्ण नाशिक शहरात, १,३१० रुग्ण नाशिक ग्रामीणला, १३८ रुग्ण मालेगावमध्ये, तर २४ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ८६ हजार २०१ असून, त्यातील दोन लाख ८३ हजार ००२ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख २१२४ रुग्ण बाधित आढळून आले असून, १,०७५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 215 patients in the district are corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.