२१५८ एस. टी. कर्मचाऱ्यांना ५ हजारांची वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 01:36 AM2021-12-05T01:36:06+5:302021-12-05T01:36:30+5:30
विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनात परिवहन मंत्र्यांनी वाढ जाहीर केली असली, तरी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ फेटाळत संपावर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे असतानाही महामंडळाकडून सर्व आगारप्रमुखांना सुधारीत वेतनश्रेणीनुसार कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक विभागाने कर्मचाऱ्यांची वेतनिश्चिती केली असून, विभागातील २१५८ कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५ हजारांची वाढ होणार आहे.
नाशिक : विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनात परिवहन मंत्र्यांनी वाढ जाहीर केली असली, तरी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ फेटाळत संपावर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे असतानाही महामंडळाकडून सर्व आगारप्रमुखांना सुधारीत वेतनश्रेणीनुसार कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक विभागाने कर्मचाऱ्यांची वेतनिश्चिती केली असून, विभागातील २१५८ कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५ हजारांची वाढ होणार आहे.
एस. टी. महामंडळाचे शासनात लागलीच विलीनीकरण करणे शक्य नसल्याने निदान वेतनवाढ जाहीर करून कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. सुधारित वेतनश्रेणीनुसार दहा वर्षांच्या आत ज्यांची सेवा झालेली आहे त्यांच्या वेतनात ५ हजारांची वाढ होणार आहे. त्यानुसार नाशिक विभागात अशाप्रकारचे सुमारे २१५८ कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे. १० ते २० वर्षांच्या आत सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४ हजारांची वाढ देण्यात आलेली असून, १५६२ कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे, तर २० वर्षांच्या पुढे देय असलेली अडीच हजारांची सुधारित वेतनश्रेणी १५७० कर्मचाऱ्यांना लागू झालेली आहे.
नाशिक विभागात ५,२९० कर्मचारी सेवेत असून, त्यातील बहुतांश कर्मचारी सध्या संपावर आहेत. महामंडळाने जाहीर केेलेली वेतनवाढ ही सर्वच कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे त्यामुळे हजर कर्मचाऱ्यांच्या कामाच्या दिवसानुसार त्यांना येत्या सात तारखेला वेतन अदा केेले जाणार आहे. सुधारित वेतनवाढ सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांसाठी असल्याने नियमानुसार कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसारच नोव्हेंबरचा पगार डिसेंबरमध्ये अदा केला जाणार आहे.