जिल्ह्यात २१९ रुग्ण कोरोनामुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:26 AM2020-08-10T01:26:32+5:302020-08-10T01:26:57+5:30
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.९) २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन ४२४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ५९७ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.९) २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन ४२४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ५९७ वर पोहोचली आहे.
रविवारी नवीन ८०४ बाधित रुग्ण दाखल झाले असून, त्यात महानगरातील ५५१, मालेगावचे २६, जिल्हा रुग्णालय ९, मेडिकल कॉलेज ११, ग्रामीण ११८, तर गृहविलगी करणातील ८९ रुग्णांचा समावेश आहे. बाधित १९,९७४ रुग्णांपैकी १४,८६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४,५१३ आहे. त्यात मनपा क्षेत्रात ३०५५, ग्रामीणला ४९३, मालेगावला १०६, जिल्हा रुग्णालय ७४, डॉ. वसंत पवार रुग्णालय १२४ आणि गृहविलगी करणांतर्गत ६६१ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात झालेल्या पाच मृत्यूंपैकी तीन मृत्यू हे ग्रामीणचे, तर दोन नाशिक शहरातील आहेत. ग्रामीणच्या तिघांपैकी एक व्यक्ती मालेगाव, दुसरा सिन्नर, तर तिसरा निफाड तालुक्यातील रहिवासी आहे, तर महानगरातील दोघांमध्ये एक वडाळागावचा, तर दुसरा कोणार्कनगरचा रहिवासी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या ८८८ वर पोहोचली आहे.