गुरुवारपासून २१ वे राष्ट्रीय अधिवेशन
By admin | Published: October 29, 2014 12:20 AM2014-10-29T00:20:25+5:302014-10-29T00:20:39+5:30
गुरुवारपासून २१ वे राष्ट्रीय अधिवेशन
नाशिक : राज्य कौन्सिल आॅफ एज्युकेशन अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मॅनेजमेंट, पुणे व डॉ. एम. एस. जी फाउण्डेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात येत्या गुरुवारपासून (दि. ३०) तीनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार असल्याची माहिती अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. मो. स. गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘शिक्षणातील दर्जात्मक सुधारणा’ या विषयावर तीनदिवसीय २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. याअंतर्गत ‘एनर्जी मॅनेजमेंट’, ‘क्वालिटी मॅनेजमेंट इन हायर एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन’, ‘क्वालिटी मॅनेजमेंट इन टेक्नॉलॉजी अॅण्ड इंजिनिअरिंग एज्युकेशन’, ‘उद्योजकता विकास व्यवस्थापन’ अशा तांत्रिक विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आल्याची माहिती गोसावी यांनी यावेळी दिली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, पुणे येथील आंतरराष्ट्रीय मल्टी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद तलगिरी, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित, अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर आदि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी बिटको महाविद्यालयाचा सुवर्णजयंती सांगता सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)