हज-उमरा यात्रेच्या आमिषाने २२ लाख ९८ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:12 AM2021-01-15T04:12:28+5:302021-01-15T04:12:28+5:30
मालेगाव: येथील हज उमरा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे मालक व उमरा यात्रेच्या आयोजकांनी हज उमरा यात्रेला ...
मालेगाव: येथील हज उमरा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे मालक व उमरा यात्रेच्या आयोजकांनी हज उमरा यात्रेला नेण्याचे आमिष दाखवून विश्वासघात करून २२ लाख ९८ हजारांना फसवणूक केल्याप्रकरणी आझादनगर पोलिसात फेहफजूर रहेमान खलील अहमद (रा. संजय गांधीनगर प्लॉट नं. ११ सर्वे नं. ११ तवक्कल मशिदीजवळ) याच्याविरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फयाज अहमद मुख्तार अहमद (५०, रा. अक्सा कॅालनी प्लॉट नं. ९८ सर्वे नं. २६०) यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ ते १९ सप्टेंबर २०१९ दरम्यान ही घटना घडली. यातील आरोपी हज उमरा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स हे उमरा यात्रेचे आयोजक असून, त्यांनी फिर्यादी व अन्य १९ लोकांचा विश्वास संपादन करून हज यात्रेला नेण्याचे आमिष दाखवून पैसे घेऊन पावत्याही दिल्या. मूळ पासपोर्ट जमा करुन फिर्यादीकडून दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी १ लाख ३२ हजार रुपये संजय गांधीनगर येथील कार्यालयात घेतले. अन्य १९ जणांकडून २१ लाख ६६ हजार ५०० रुपये घेऊन हजयात्रेला नेण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी व अन्य १९ लोकांचा विश्वासघात करून २२ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करत आहेत.