जिल्ह्यात होणार २२ लाख रोपांची लागवड
By admin | Published: May 23, 2017 04:15 PM2017-05-23T16:15:39+5:302017-05-23T16:29:29+5:30
वन मंत्रालयाने राज्यात १जुलै ते ७ जुलैच्या दरम्यान वनमहोत्सवांतर्गत चार कोटी रोपांच्या लागवडीचा संकल्प सोडला
नाशिक : वन मंत्रालयाने राज्यात १जुलै ते ७ जुलैच्या दरम्यान वनमहोत्सवांतर्गत चार कोटी रोपांच्या लागवडीचा संकल्प सोडला आहे. या दरम्यान, जिल्ह्यात नाशिक वनविभाग 22 लाख रोपांची लागवडीसाठी सज्ज झाले आहे. वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये मोठ्या संख्येने रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
वैश्विक तपमान वाढ, पर्यावरणाचे ढासाळलेला समतोल, बिघडलेले पर्जन्यमान आदिंचे संकट गडद होत आहे. यामुळे राज्याच्या वन मंत्रालयाने येत्या तीन वर्षांमध्ये संपुर्ण राज्यात ५० कोटी रोपांच्या लागवडीचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. येत्या १जुलैपासून आठवडाभरात संपूर्ण राज्यात चार कोटी रोपांची लागवड करण्यााचा शासनाचा मानस आहे.
या उपक्रमांतर्गत नाशिक वनविभाग, सामाजिक वनीकरण वनविकास महामंडळांकडून ठिकठिकाणी निवडलेल्या वनजमिनींवर खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच रोपवाटिकांमध्ये रोपेही तयार करण्यात आली आहे. वनविभागाकडून वनमहोत्सवाची जनजागृती केली जात आहे. लोकसहभाग वाढावा या दृष्टीकोनातून ठिकठिकाणी भीत्तीपत्रके, सोशल मिडियाच्या माध्यमातून वनमहोत्सवाचा प्रचार-प्रसार केला जात आहे.