कळमदरी सोसायटीत २२ लाखांचा घोटाळा, सचिवास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 03:18 PM2017-11-27T15:18:28+5:302017-11-27T15:18:54+5:30
नांदगाव-तालुक्यातील कळमदरी विविध कार्यकारी सोसायटीच्या २२ लाख रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी नांदगांव पोलिसांनी बँक निरीक्षक, सोसायटी सचिव व सेक्र ेटरी यांच्यावर सोमवारी फौजदारी गुन्हा दाखला आहे. सचिव संतोष निवृत्ती कोल्हे यांना पोलिसांनी अटक केली असून इतर दोन संशयीत आरोपी अद्याप ताब्यात आलेले नाहीत. कळमदरी सोसायटी घोटाळ्यात अजुन इतर तिघांची पोलीस कसून चौकशी करीत असल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

एप्रिल १७ मध्ये नांदगांव पोलिसात दाखल तक्र ारीवरु न कळमदरी सोसायटीचे झालेल्या लेखा परीक्षणात सन २०१६-१७ मध्ये २२ लाख रूपये गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ बँक अधिकारी पिंगळे यांनी विशेष लेखा परीक्षक किरण गुंजाळ यांना तक्र ार करण्याचा आदेश दिला. गुंजाळ यांनी सरकारी वकिलाचा अभिप्राय घेऊन, नांदगांव पोलिसात अफरातफर करणे फसवणूक करणे, दिशाभुल करणे या स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल केला होता. पो. ह. श्रावण बोगीर व रवींद्र चौधरी यांनी केलेल्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात आली. सचिव मच्छिंद लव्हाटे व बँक निरीक्षक आर. एन. पगार अजून पोलिसांना सापडले नाहीत. तसेच या गैरव्यवहार प्रकरणातील देसले आहेर मोरे यांची चौकशी चालू आहे. यातील अजुन काही मोहरे ज्यांना या अगोदर क्लींनचीट मिळाली होती ते या चौकशीत अडकण्याची शक्यता आहे.