लोकअदालतीत २२ हजार ८९१ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:15 AM2019-03-18T01:15:24+5:302019-03-18T01:15:41+5:30
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई त्यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी दोन हजार २२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दावा दाखव पूर्व २० हजार ६६६ असे एकूण २२ हजार ८९१ प्रकरणांचाही निपटारा करण्यात आला.
लोकअदालतीमध्ये दाखल प्रकरणांची पडताळणी करताना अधिकारीवर्ग.
नाशिक : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई त्यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी दोन हजार २२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दावा दाखव पूर्व २० हजार ६६६ असे एकूण २२ हजार ८९१ प्रकरणांचाही निपटारा करण्यात आला.
नाशिक जिल्ह्यात प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश रवींद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात रविवारी लोकअदालत घेण्यात आली. यावेळी लोक न्यायालयात नाशिक जिल्ह्यातून प्रलंबित प्रकरणांपैकी ८ हजार ४ ७१ प्रकरणांसह दावा दाखल पूर्व अशी एकूण ९४ हजार ६२५ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी २ हजार २२५ प्रकरणे लोक न्यायालयात निकाली निघाली असून, दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी २० हजार ६६६ असे एकूण २ हजार ८९१ प्रकरणांचा लोकअदालतीच्या माध्यमातून एका दिवसात निपटारा करण्यात आला. लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन विविध प्रकारचे कलह मिटविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या जिल्हाभरातील न्यायिक अधिकारी वकील, पक्षकार यांचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांने आभार मानले.