लखमापूर शिवारात २२ हजारांचे मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:40 AM2018-10-19T01:40:14+5:302018-10-19T01:40:47+5:30
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर शिवारात बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या जीपसह दोन लाख २२ हजार ४६४ रुपयांचा ऐवज लखमापूर येथील महिलांनी पकडून दिला आहे.
दिंडोरी : तालुक्यातील लखमापूर शिवारात बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या जीपसह दोन लाख २२ हजार ४६४ रुपयांचा ऐवज लखमापूर येथील महिलांनी पकडून दिला आहे.
लखमापूर शिवारात मंगळवारी, रात्री ११ वाजेच्या सुमारास लखमापूर फाट्याकडून कोशिंबे येथे जाणारी मार्शल जीप अब्दुल्ला खान यांच्या भंगाराच्या दुकानासमोर गुप्त माहितीच्या आधारे लखमापूर येथील नभाबाई बलसाने, मानवाधिकारचे प्रेम गांगुर्डे, संदीप अवधूत आदींसह काही स्थानिक महिलांनी अडवली.
यावेळी जीपमध्ये दारूच्या बाटल्यांनी भरलेले देशी दारूचे नऊ बॉक्स आढळले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी जीप गाडीसह प्रिन्स संत्रा नावाच्या प्रत्येकी ४८ दारूच्या बाटल्या असलेली एकूण नऊ खोकी दारू (किंमत २२ हजार ४६४ रुपये) व २ लाख रुपये किमतीची जीप जप्त केली आहे. वाहनचालक कृष्णा बाळू बोडके, रा. कोशिंबे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.