भोजापूर धरणात 22 टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 04:29 PM2020-07-25T16:29:29+5:302020-07-25T16:34:14+5:30

नांदरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नद्या वाहत्या झाल्या आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानाकडे तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत 80 दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

22% water storage in Bhojapur dam | भोजापूर धरणात 22 टक्के पाणीसाठा

 सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील पाणीसाठा.

googlenewsNext
ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी: गतवर्षी आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरले होते धरण

नांदरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नद्या वाहत्या झाल्या आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानाकडे तसेच भोजापूर
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत 80 दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
तालुक्यासह परिसरातील गांवामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासूनच दमदार पाऊस पडल्याने बळीराजा समाधानी आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वच भागात पाऊस पडत आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मागील आठवड्यात पावसाचा जोर ओसरला होता. परंतु पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेती शिवार हिरवेगार झाले आहे. तसेच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी
भोजापूर धरणाच्या पाणी साठ्यावरच लाभक्षेत्रातील शेतीचे गणित अवलंबून
असते. परंतु. पाणलोट क्षेत्रात पाऊस न
झाल्याने धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी भोजापूर धरण दोन आँगस्टला पूर्ण भरले होते. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत
वाढला नाही. गतवर्षी भोजापूर धरणात 27 जुलै पासून पाण्याची आवक सुरु झाली होती. गेल्यावर्षी दोनच दिवसात धरणात 45 टक्के पाण्याची आवक झाली होती. तसेच दोन महिन्याच्या आसपास धरणातून पूरपाणी सुरु होते. भोजापूरच्या धरणाच्या पाण्यावर कणकोरी व मनेगाव नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. यावर्षी खरीप हंगामातच पावसाने जोरदार सलामी दिल्याने बळीराजा सुखावला आहे.


 

 

Web Title: 22% water storage in Bhojapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.