जिल्ह्यात २२१ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:46+5:302020-12-14T04:30:46+5:30

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. १३) कोरोनाचे एकूण २२१ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी ...

221 new patients in the district | जिल्ह्यात २२१ नवीन रुग्ण

जिल्ह्यात २२१ नवीन रुग्ण

Next

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. १३) कोरोनाचे एकूण २२१ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर ग्रामीणचे ४ आणि शहराचे २ याप्रमाणे ६ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १८६४ वर पोहोचली आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ३३५ वर पोहोचली असून, त्यातील ९९ हजार ९५९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. ३,५१२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९४.०९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.४७, नाशिक ग्रामीण ९३.९९, मालेगाव शहरात ९२.७२, तर जिल्हाबाह्य ९२.६० असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,५१२ बाधित रुग्णांमध्ये २२०४ रुग्ण नाशिक शहरात, १,१३१ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १५२ रुग्ण मालेगावमध्ये, तर २५ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख २ हजार ४२६ असून, त्यातील दोन लाख ९६ हजार ९६६३५९ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ५ हजार ३३५ रुग्ण बाधित आढळून आले असून, ७३२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 221 new patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.