नाकाबंदीमध्ये २३४ वाहनांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:21 AM2021-02-26T04:21:14+5:302021-02-26T04:21:14+5:30

नाशिक : कोरोनाने शहरासह जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढल्याने रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या अंमलबजावणीबाबत प्रारंभी ...

234 vehicles cleared in blockade | नाकाबंदीमध्ये २३४ वाहनांची झाडाझडती

नाकाबंदीमध्ये २३४ वाहनांची झाडाझडती

Next

नाशिक : कोरोनाने शहरासह जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढल्याने रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या अंमलबजावणीबाबत प्रारंभी काहीशी मरगळ दिसून येत होती. शहरातील प्रमुख चौकांमध्येही रात्रीच्या वेळी पोलीस नजरेस पडत नव्हते. याकडे ‘लोकमत’ने सचित्र ‘रिॲलिटी चेक’ हे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणीवर भर देत पहाटेपर्यंत सुमारे २३४ वाहनांची झाडाझडती घेतली. तसेच पोलीस गस्तही चोखपणे सुरू झाल्याचे दिसून आले.

शहर व परिसरात पोलीस आयुक्तांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा देणाऱ्या व्यक्तींवगळता कोणीही रस्त्यांवर भटकंती करणार नाही तसेच मास्कविना चौकाचौकांत रात्री उशिरापर्यंत ठिय्या देत गप्पांचे फड रंगविण्यासही बंदी घालण्यात आली आहे; मात्र आयुक्तालयातील काही भागांमध्ये याविरुद्ध चित्र रात्रीच्यावेळी पहावयास मिळत होते. यामुळे रात्रीची संचारबंदी आहे तरी कुठं? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात होता.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागला गुरुवारी (दि.२५) ६०१नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शहराचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७९ हजार ७५० इतका झाला आहे.

शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. कलम १४४च्या कायद्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कोणीही विनाकारण रस्त्यांवर भरकटणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.

--इन्फो--

...या ठिकाणी रस्त्यांवर अवतरले पोलीस

शहरातील जत्रा चौफुली, आडगाव, म्हसरूळ गाव चौक, काट्यामारुती चौक, बनकर चौक, काठेगल्ली, भद्रकाली, विनयनगर, मुंबईनाका, कॉलेजरोड, जेहान सिग्नल, गंगापूर गाव, अशोकनगर, सातपूर गाव, बडदेनगर, अंबड, पाथर्डीफाटा , इंदिरानगर, उपनगर, तपोवनरोड, दसक पूल, नाशिकरोड, देवळाली कॅम्प आदी ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेडिंग करत कडक नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून चौकशी केली.

Web Title: 234 vehicles cleared in blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.