शब्दार्थाला अभिव्यक्त करणारे ‘अक्षर उवाच’ प्रदर्शन २३ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:44+5:302021-01-22T04:14:44+5:30
नाशिक : प्रत्येक अक्षराला त्याच्या अर्थानुसार शरीरसौष्ठव देत दोन अक्षरांतील डोळ्यांना सुखावणारा तसेच शब्दात न सांगता येणारा 'आंतरिक सेन्स' ...
नाशिक : प्रत्येक अक्षराला त्याच्या अर्थानुसार शरीरसौष्ठव देत दोन अक्षरांतील डोळ्यांना सुखावणारा तसेच शब्दात न सांगता येणारा 'आंतरिक सेन्स' अभिव्यक्त करण्याची जादू शब्दरेषाकार सुनील धोपावकर यांच्या टायपोग्राफीत आहे. त्यांच्या बोलक्या अक्षरांचे ‘अक्षर उवाच’ हे शब्द प्रदर्शन येत्या २३ जानेवारीपासून सावानाच्या बालभवनमध्ये सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते शनिवार दि.२३ जानेवारीला सकाळी १० वाजता होणार आहे. या बोलक्या अक्षरांचे हे प्रदर्शन सार्वजनिक वाचनालय, नाशिक बालभवनतर्फे दि. २३ ते २८ जानेवारीपर्यत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सावाना मु.शं.औरंगाबादकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. अक्षरांच्या या सोहळ्यातील प्रत्येक शब्द पाहणाऱ्याला साधा सोपा तरीही अतिशय सुंदर आणि अर्थवाही दिसतो. मराठी वाचनापासून दूर गेलेल्या नव्या पिढीला वाचनसंस्कृतीशी परत जोडणारी ही अक्षरकला दिग्मूढ करणारी असून ही बोलकी अक्षरे जगभर प्रसिद्ध झाली आहे.