२४ गणेशमंडळांवर गुन्हे दाखल

By admin | Published: September 17, 2016 12:28 AM2016-09-17T00:28:57+5:302016-09-17T00:29:42+5:30

उल्लंघन : ध्वनिप्रदूषण कायद्याची पायमल्ली

24 Ganesh Mandals have filed criminal cases | २४ गणेशमंडळांवर गुन्हे दाखल

२४ गणेशमंडळांवर गुन्हे दाखल

Next

नाशिक : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ध्वनिमर्यादेचे डीजे लावून उल्लंघन करणाऱ्या चोवीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी तसेच डीजेच्या आॅपरेटर विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी गणेश विसर्जनापूर्वी लोकप्रतिनिधी, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या निर्देशांचे व ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन न करण्याबाबत मार्गदर्शन केले होते़ तसेच ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही पोलिसांना दिले होते़ पोलीस अधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीपुर्वी डीजेचा वापर करणारे मंडळाचे पदाधिकारी व डीजेचालकांना ध्वनीची पातळी अधिक असल्याचे निदर्शनास आणून दिले होते़; मात्र तरीही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आवाजाची तीव्रता कमी न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे़
श्रीणगेश विसर्जन मिरवणुकीत भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक आठ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ तर उर्वरितांमध्ये अंबड पोलीस ठाणे एक, पंचवटी पोलीस ठाणे चार, गंगापूर पोलीस ठाणे दोन, मुंबई नाका पोलीस ठाणे तीन, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन आणि अन्य चार सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 24 Ganesh Mandals have filed criminal cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.