युवकाच्या खुनाचा २४ तासात छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:26 AM2019-02-06T00:26:00+5:302019-02-06T00:28:32+5:30
वणी : कृष्णगाव शिवारात झालेल्या अनोळखी युवकाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात छडा लावला असून, व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वादातून युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिकच्या कोणार्कनगरमधील अक्षय ऊर्फ आशुतोष रामा चव्हाण (२१) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
वणी : कृष्णगाव शिवारात झालेल्या अनोळखी युवकाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात छडा लावला असून, व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वादातून युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिकच्या कोणार्कनगरमधील अक्षय ऊर्फ आशुतोष रामा चव्हाण (२१) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी वणी -दिंडोरी रस्त्यावरील कृष्णगाव शिवारातील जलवाहिनीच्या लिक व्हॉल्व्हकडे अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. घटनास्थळावर आशुतोष रामा चव्हाण या नावाचा वाहन चालविण्याचा परवाना आढळून आला. तसेच मयताच्या हातावर अक्षय असे नाव होते.
पोलीस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. वाहन चालविण्याच्या परवान्याच्या पत्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपर्क साधला असता मयत हा आशुतोष चव्हाण (रा. कोणार्कनगर, पंचकृष्ण लॉन्सजवळ, नाशिक) असल्याचे पुढे आले. आशुतोष सोबत घटनेच्या दिवशी दोन इसम हॉटेल जत्रा परिसरातून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून गेल्याची माहिती पथकाला मिळाली. जत्रा हॉटेल ते धात्रक फाटा परिसरात सापळा रचून रामदास ऊर्फ पिन्या दौलत पवार (२६) रा. निशांत गार्डन, धात्रक फाटा, नाशिक व किशोर बाळासाहेब पवार यांना ताब्यात घेतले.
दिनांक ३ रोजी या दोघांनी आशुतोष याला कारमधे घेऊन दहावा मैल परिसरातील हॉटेलमधे जेवणासाठी गेले. तेथून ते कृष्णगाव शिवारात आले. व लघुशंकेसाठी घटनास्थळावर गेले असता आशुतोष यांच्याशी दोघांची बाचाबाची झाली. शिवीगाळ करण्यात आल्यानंतर दोघांनी आशुतोषला जमिनीवर पाडून दगडाने चेहरा व डोके ठेचून आशुतोष याचा खून संगनमताने करु न पुरावा नष्ट केल्याचे तपासात पुढे आले. दरम्यान रामदास पवार याने अक्षय उर्फ आशुतोष याच्याकडून व्याजाने पंधरा हजार रु पये उसने घेतले होते. पैशासाठी आशुतोष याने रामदासकडे तगादा लावला व पैसे दिले नाही तर कुटुंब संपविण्याची धमकी आशुतोष याने दिल्याने दोघांनी आशुतोषचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले.गुन्ह्यात वापरलेली एमएच१५ ई ई ०९०३ ही कारही जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी करीत आहेत.