चोरट्यांकडून चोरीच्या २४ दुचाकी जप्त

By admin | Published: September 28, 2016 11:22 PM2016-09-28T23:22:41+5:302016-09-28T23:23:17+5:30

युनिट एकची कारवाई : दोन संशयितांना अटक; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

24 robberies stolen from thieves | चोरट्यांकडून चोरीच्या २४ दुचाकी जप्त

चोरट्यांकडून चोरीच्या २४ दुचाकी जप्त

Next

नाशिक : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोन संशयितांना शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ यापैकी एक संशयित अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील सोमठाणे येथील असून, त्याचे नाव सचिन देवराम तळपाडे (२३) तर दुसऱ्याचे नाव अंकुश गणपत गांगुर्डे असल्याचे पोलीस डॉ़ आयुक्त रवींद्र सिंघल यांनी मंगळवारी (दि़२७) पत्रकार परिषदेत सांगितले़
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांना संशयित तळपाडे हा सीबीएस परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती़ त्यानुसार सापळा रचून त्यास ताब्यात घेतले असता त्याने २०१५ मध्ये इंदिरानगर परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने नाशिकरोड, इंदिरानगर, उपनगर, शहापूर, कल्याण, ठाणे आदि ठिकाणांहून चोरी केलेल्या ४ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २० दुचाकीही काढून दिल्या़
गुन्हे शाखेने पकडलेला दुसरा संशयित अंकुश गांगुर्डे याने त्र्यंबकेश्वर, वणी, दिंडोरी या तालुक्यांमधून दुचाकी कबुली देऊन चोरीच्या चार दुचाकीही काढून दिल्या़ सहायक पोलीस निरीक्षक एन. एन. मोहिते, दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पाठक, पळशीकर, गोविंद बस्ते, हवालदार दिघोळे, सदावर्ते, नाईक शरद सोनवणे, शिपाई शांताराम महाले, विशाल देवरे, शंकर गडदे, नीलेश काटकर, विजय टेमगर, विशाल काठे, अतीश पवार, नीलेश भोईर, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे, हर्षल बोरसे, संदीप भुरे, शेख, निर्मला हाके यांनी ही कामगिरी केली़
या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे (गुन्हे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार आदि उपस्थित होते.
 

Web Title: 24 robberies stolen from thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.