२४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:30 PM2018-08-19T22:30:54+5:302018-08-19T22:32:42+5:30

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

24 thousand kilometers bicycle wandering meeting 'man' | २४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’

२४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’

googlenewsNext
ठळक मुद्देजगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, पंथ असा भेदभाव जाणवला नाहीम्हणून भारताची प्रतिमा मलिनअनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता

नाशिक : सायकलवरुन ३१ देशांच्या भ्रमंतीसाठी सायकलवरुन निघालो असताना जगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, भाषा, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव जाणवला नाही तर माणुसकीच श्रेष्ठ असल्याचा अनुभव मला आला. या सहाशे दिवसांच्या सायकलभ्रमंतीमध्ये मला सच्चा माणूस जागोजागी भेटला. ही भ्रमंती थरारक जरी असली तरी माझ्या आंतरबाह्य बदलाची साक्षीदारही आहे, असे २४ हजार किलोमीटरचे अंतर सायकलवरुन पुर्ण करणाऱ्या देवळाली गावातील योगेश गुप्ता यांनी सांगितले.
गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संजय पाटील, निता नारंग, विनायक रानडे, जयेश आपटे, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहशे दिवसांची सायकलभ्रमंती व त्यामध्ये आलेले अनुभव याबाबत संवादक अपर्णा क्षेमकल्याणी यांनी योगेश गुप्ता यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुप्ता म्हणाले, सायकलवर तंबू, स्लिपिंग बॅग, दोन जोडी कपडे व सायकल दुरु स्तीचे सामान घेऊन घराबाहेर पडलो. खरे जीवन अनुभवण्याकरिता महामार्गाची निवड न करता आडवाटेचा मार्ग निवडला. सर्वच ठिकाणी स्थानिकांचे खूप सहकार्य मिळाले तसेच आपुलकीमुळे माझा प्रवास सोपा झाला आणि एक वेगळीच अनुभूती मिळाली. कोणत्याही देशातील सामान्य नागरिकांना युद्ध नको असल्याचे सांगताना अनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता पहावयास मिळाल्याचे गुप्ता यांनी आवर्जून यावेळी नमुद केले.
-इन्फो-
...म्हणून भारताची प्रतिमा मलिन
इराणचे नागरिक अत्यंत स्वागतशील असून तेथे भेटलेल्या एका व्यक्तीने तर चक्क त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मागणी घातली आणि ते बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. अनेक देशांमध्ये आजही जुने हिंदी चित्रपटांची गीते लोकिप्रय आहेत. माध्यमांतून येणाºया भारतातील हिंसाचार, बलात्कार, असुरक्षितता, अस्वच्छता, जातीय तेढ आदि बातम्यांमुळे भारताची प्रतिमा विदेशात जनसामान्यात नकारात्मक होत असल्याची खंत त्यांनी अनुभव सांगताना व्यक्त केली.

Web Title: 24 thousand kilometers bicycle wandering meeting 'man'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.