२४४ केबलचालकांना थकबाकीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:03 AM2017-08-19T00:03:04+5:302017-08-19T00:12:10+5:30

शासनाचा करमणूक कर थकविणाºया जिल्ह्यातील २४४ केबलचालकांना प्रशासनाने थकबाकीच्या नोटिसा बजावल्या असून, आठ दिवसांच्या आत पैसे न भरल्यास त्यांचे प्रक्षेपण खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

244 Custody Notices for outstanding | २४४ केबलचालकांना थकबाकीच्या नोटिसा

२४४ केबलचालकांना थकबाकीच्या नोटिसा

googlenewsNext

नाशिक : शासनाचा करमणूक कर थकविणाºया जिल्ह्यातील २४४ केबलचालकांना प्रशासनाने थकबाकीच्या नोटिसा बजावल्या असून, आठ दिवसांच्या आत पैसे न भरल्यास त्यांचे प्रक्षेपण खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
देशात १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यापासून करमणूक कराची वसुली आता स्थानिक संस्थांकडे म्हणजेच नाशिक शहरातील करमणूक कराची वसुली नाशिक महापालिका, नगरपालिका हद्दीत मुख्याधिकारी व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तत्पूर्वी करमणूक कराची वसुली ही महसूल विभागाच्या अखत्यारितील करमणूक कर विभागाकडून केली जात होती. जुलैपूर्वी जिल्ह्यातील २४४ केबलचालकांकडे सुमारे दीड कोटी रुपयांची थकबाकी असून, या ना त्या कारणाने त्यांनी कर भरण्यास टाळाटाळ चालविली होती.

Web Title: 244 Custody Notices for outstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.