२४६ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 01:27 AM2020-12-28T01:27:29+5:302020-12-28T01:28:16+5:30
जिल्ह्यात रविवारी एकूण नवीन २०७ रुग्णांना कोरोना झाला असून, २४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या १९५० वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात रविवारी एकूण नवीन २०७ रुग्णांना कोरोना झाला असून, २४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या १९५० वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ९ हजार ११९ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ४ हजार ८१७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर २३५२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.०६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.८५, नाशिक ग्रामीण ९४.८५, मालेगाव शहरात ९२.६७, तर जिल्हाबाह्य ९३.३५ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २३५२ बाधित रुग्णांमध्ये १२९० रुग्ण नाशिक शहरात, ८८६ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १५९ रुग्ण मालेगावमध्ये, तर १७ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख २३ हजार १५३ असून, त्यातील ३ लाख १३ हजार ३९८ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ९ हजार ११९ रुग्ण बाधित आढळून आले असून, ६३७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.