विभागात २४७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:40+5:302020-12-23T04:12:40+5:30
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात ‘झुम ॲप’ द्वारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अहमदनगरचे ...
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात ‘झुम ॲप’ द्वारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, धुळेचे जिल्हाधिकारी संजय यादव, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड व प्रत्येक जिल्ह्यातील प्रांत अधिकारी व तहसीलदार झुमद्वारे बैठकीस उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त अर्जुन चिखले (महसूल), उपायुक्त (सामान्य) अरुण आनंदकर उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार असून, प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी हेल्प डेस्कची निर्मिती करून त्या ठिकाणी ऑनलाइन पध्दतीने उमेदवाराचे नामनिर्देशन व घोषणापत्र भरून घ्यावे अशा सूचना गमे यांनी दिल्या आहेत. प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी ईव्हीएम मशीन निवडणुकीपूर्वी व मतमोजणीनंतर जिथे ठेवण्यात येतील त्या ठिकाणाची पाहणी करावी तसेच निवडणूक आदेशानुसार सहा वेळा पाहणी करून परिपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाला पाठविणे आवश्यक असल्याचे, विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले. आचारसंहितेचे उल्लंघन होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात याव्यात, असे निर्देश गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.