खासगी बालरुग्णालयातील २५ टक्के खाटा आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:15 AM2021-05-12T04:15:38+5:302021-05-12T04:15:38+5:30
शहरातील बालरोग तज्ज्ञांची बैठक मंगळवारी (दि.१२) आयुक्त कैलास जाधव यांच्या दालनात पार पडली. यावेळी आयुक्तांनी या सूचना केल्या आहेत. ...
शहरातील बालरोग तज्ज्ञांची बैठक मंगळवारी (दि.१२) आयुक्त कैलास जाधव यांच्या दालनात पार पडली. यावेळी आयुक्तांनी या सूचना केल्या आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने आत्तापासून नियोजन सुरू केेले आहे. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच नाशिक शहरातील बालरोगतज्ज्ञ त्यांच्याकडे असणाऱ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण खाटांच्या संख्येच्या तुलनेत २५ टक्के खाटा कोरोनाबाधित बालरुग्णांसाठी आरक्षित ठेवाव्या. रुग्णसंख्या वाढल्यास टप्प्याटप्प्याने त्या बेडच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.
यावेळी बालरोग तज्ज्ञांकडून शहरातील हॉस्पिटलची संख्या, बेड व त्यांच्याकडे उपलब्ध असणारे व्हेंटिलेटर याबाबतची माहिती या बैठकीत घेण्यात आली. बालरोग तज्ज्ञांनीही विविध सूचना केल्या. भविष्यातील नियोजन म्हणून लहान बालकांना कोरोना झाल्यास कोणत्या पद्धतीचे उपचार करावेत त्यांना कोणत्या व्हॅक्सिन द्यावे किंवा त्याबाबतच्या उपचाराचा प्रोटोकॉल याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, मनपाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. नवीन बाजी, आयएमए संघटनेचे अध्यक्ष हेमंत सोननिस, सचिव कविता गाडेकर, बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या सचिव रीना राठी यांच्यासह विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
इन्फो...
ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या सूचना
ज्या बाल किंवा बालरोग विभाग असलेल्या रुग्णालयात ५० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांची व्यवस्था आहे त्यांनी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी दिल्या. मनपाच्या सीबीआरएस सिस्टीममध्ये सर्व माहिती अद्ययावत करावी, त्यामुळे मनपा प्रशासनाकडून जी वेळोवेळी खासगी रुग्णालयांना मदत अपेक्षित आहे. ती त्या प्रमाणात करता येणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
----
छायाचित्र आर फोटोवर ११ एनएमसी--- महापालिकेच्या वतीने आयोजित बालरोगतज्ज्ञांच्या बैठकीत बोलताना आयुक्त कैलास जाधव. समवेत डॉ. बापुसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, डॉ. प्रशांत शेटे आदी.
===Photopath===
110521\11nsk_37_11052021_13.jpg
===Caption===
महापालिकेच्या वतीने आयोजित बाल रोग तज्ज्ञांच्या बैठकीत बोलताना आयुक्त कैलास जाधव. समवेत डॉ. बापुसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, डॉ. प्रशांत शेटे आदी.