जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:39+5:302021-06-20T04:11:39+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. १९) जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. ते पुढे ...

25 crore fund for district sports complex | जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ कोटींचा निधी

जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ कोटींचा निधी

Next

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. १९) जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले, महानगरपालिकेमार्फत जिल्हा क्रीडा संकुलासोबत तेथे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सांगितलेल्या पार्किंगच्या प्रस्तावाबाबतही विचार करण्यात आला; परंतु स्मार्ट सिटीच्या पार्किंगसहित विकसन करण्याबाबतच्या प्रस्तावासाठी स्मार्ट सिटी, जिल्हा परिषद अथवा महापालिका यांच्याकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे पूर्ववत मूळ प्रस्तावित आराखड्यानुसार सर्व सोयींनीयुक्त क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरू करावे. तसेच सर्व विभागांशी समन्वय साधून क्रीडाविषयक सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उपशिक्षण अधिकारी एस. एन. झोले, महानगरपालिका उपअभियंता एस. जे. काझी, आंतरराष्ट्रीय धावपट्टू कविता राऊत, शिवछत्रपती पुरस्कार्थी हितेंद्र महाजन, गोरख बलकवडे, राजेंद्र निबांळते आदी उपस्थित होते.

चौकट===

असे असेल क्रीडा संकुल

क्रीडा संकुलात प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरी, सिथेटिक धावमार्ग, फुटबॉल मैदान, व्हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी, टेनिस, बास्केटबॉल, इत्यादी मैदाने, इनडोअर गेम हॉलमध्ये बॅटमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, ज्युदो, तलवारबाजी, बॉक्सिंग, कॅरम, बुध्दिबळ, योगा, व्यायमशाळा याव्यतिरीक्त कॅफेटेरीया, पार्किंग अशा एकूण २४ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Web Title: 25 crore fund for district sports complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.