जिल्ह्यातील बाजार समित्यांची २५ कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:15 AM2021-05-13T04:15:15+5:302021-05-13T04:15:15+5:30
कोट- लॉकडाऊनच्या काळात ज्या शेतकऱ्यांना आपला शेती माल विकावयाचा आहे त्यांना बाजार समितीने पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशा सूचना ...
कोट-
लॉकडाऊनच्या काळात ज्या शेतकऱ्यांना आपला शेती माल विकावयाचा आहे त्यांना बाजार समितीने पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशा सूचना सर्व बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या काळातील कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व बाजार समित्यांवर तालुका सहायक उपनिबंधकांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. - सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
चौकट -
शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळणार
लासलगाव बाजार समितीने बंदच्या काळात शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली असून, ज्या शेतकऱ्यांना आपला माल विकावयाचा आहे त्यांनी थेट बाजार समितीच्या अधिकृत व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. उभयतांमधील व्यवसहार झाला तर व्यापाऱ्याच्या खळ्यावर बाजार समितीचे मापारी, माथाडी कामगार उपस्थित राहणार आहेत. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना रोख स्वरुपात पैसे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढविणे यांनी दिली.