खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:18 AM2021-08-19T04:18:41+5:302021-08-19T04:18:41+5:30
नाशिक : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने जिल्ह्यात खासगी प्रवासी वाहन चालकांनीही आपले दर वाढविले आहेत. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे ...
नाशिक : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने जिल्ह्यात खासगी प्रवासी वाहन चालकांनीही आपले दर वाढविले आहेत. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शहरात प्रवासी भाड्यात तब्ब्ल २० ते २५ टक्के दरवाढ झाली आहे. त्यामुळे विशेष वाहन करून प्रवास करणाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना दिवसेंदिवस महागाईच्या झळा बसत असताना रोज वाढत्या पेट्रोल डिझेलमुळे आता नागरिकांचा प्रवासही महागला आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते दरांमुळे थेट महागाई वाढण्याचा रुपाने सर्व सामान्यांना फटका बसतो. मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे भाडे डिझेलवाढीमुळे वाढले असून त्याचा परिमाण जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या माध्यमातून दिसून येत अताना आता प्रवासी वाहन चालकांनीही त्यांची दरवाढ केली आहे खासगी ॲप टॅक्सीन प्रवास करायचा झाल्यास शहरात दोन ते तीन किमी अंतरासाठीही १२५ ते ५० रुपये मोजावे लागत आहे. तर रीक्षा चालकांनीही पूर्वी पेक्षा पाच रुपये भाडेवाढ केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना एसटीची सुविधा असली तरी खासगी वाहने भाडे वाढवून घेत आहेत. शहरात मात्र मनपाच्या बससेवेने नागरिकांना अल्पसा का होईना दिलासा दिला आहे.
---
असे वाढले पेट्रोल-डिझलेचे दर (प्रति लीटर)
वर्ष - पेट्रोल - डिझेल
जानेवारी - २०१९ - ७४.८६ -६५.०९
जानेवारी २०२० - ८१.३२ - ७०.७४
जानेवारी २०२१ - ९१.७६ - ८०.८१
ऑगस्ट २०२१ - १०८.२२ - ९६.३७
---
प्रवासी वाहनांचे प्रति ३ कि.मी.चे दर
वाहनाचा प्रकार दर
रिक्षा - २०
ॲप टॅक्सी - १२५
मनपा बस - १०
एसीटी बस - १०
\गाडीचा हप्ता कसा भरणार?\
दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपेक्षित व्यावसाय होत नाही. दिवसभरात तीन ते चार फेऱ्या होतात. अशा परिस्थितीत पेट्रोलच्या दर वाढल्यामुळे व्यवसाय करणे कठीण होत आहे. हप्त्यावर गाडी घेणारे रिक्षावाले हप्तेही भरू शकत नाही.
\राकेश साळुंके, रिक्षा चालक \
\
कोरोनामुळे पहिल्यासारखे प्रवासी मिळत नाही, त्यात पेट्रोल गेल्या सात ते आठ महिन्यात १० ते १५ रुपयांनी वाढले. त्यामुळे प्रवासी भाड्यात दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही. वाढत्या महागाईत घर चालवून गाडीवरील कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
\ - विक्रम साळवे, रिक्षा चालक \
\----------------\