नाशिकच्या ग्रामसेवकांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 08:01 PM2019-11-04T20:01:47+5:302019-11-04T21:47:13+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नाशिक जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक पंचनाम्याविषयी माहिती दिली. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकासनीचा अहवाल शासनाला सादर करण्यासाठी ग्रामसेवकांनी नेमून दिलेल्या गावातील नुकसानग्रस्त पीक पंचनामे दि.१ नोव्हेंबरपासून सुरू केले आहे.
नाशिक : परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गावखेड्यात काम करणाऱ्या ग्रामसेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन देऊन मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाभरातील ग्रामसेवकांच्या एक दिवसाच्या वेतनातून सुमारे २५ लाख रुपयांचा निधी उभा राहणार असून, हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी उपयोगात येईल, असा विश्वास ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नाशिक जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.४) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक पंचनाम्याविषयी माहिती दिली. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकासनीचा अहवाल शासनाला सादर करण्यासाठी ग्रामसेवकांनी नेमून दिलेल्या गावातील नुकसानग्रस्त पीक पंचनामे दि.१ नोव्हेंबरपासून सुरू केले असून, गावागावातील नुकसानीचा अहवाल ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे, सरचिटणीस रवींद्र शेलार यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांना सादर केला. तसेच नुकसानग्रस्त शेतकºयांच्या आर्थिक मदतीसाठी ग्रामसेवक संघटनेतर्फे ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा पदाधिकारी व तालुका अध्यक्ष सचिव यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. त्यानुसार गावपातळीवर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करताना झालेले नुकसान, शेतकऱ्यांची अगतिकता सभादांनी प्रत्यक्ष पाहिलेली असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ग्रामसेवकांनी एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांना मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून, नोव्हेंबर महिन्याच्या वेतन देयकातून ही एक दिवसाच्या वेतनाची रक्कम कपात करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे यांनी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आदी उपस्थित होते.