२५ लाखांचे सोने इगतपुरीला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:07 PM2018-09-08T23:07:35+5:302018-09-08T23:07:55+5:30

रेल्वेतून केली जात होती तस्करी इगतपुरी : तस्करीचे सोने रेल्वेने घेऊन जाणाऱ्या उल्हासनगरच्या तिघांना गीतांजली एक्स्प्रेसमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांकडून लॅपटॉप, घड्याळे, मोबाइल व विदेशी मद्याच्या बाटल्याही जप्त करºयात आल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दल आणि सीमा शुल्क विभागाने इगतपुरी रेल्वेस्थानकामध्ये ही कारवाई केली.

25 lakhs gold worth Igatpuri seized | २५ लाखांचे सोने इगतपुरीला जप्त

२५ लाखांचे सोने इगतपुरीला जप्त

Next
ठळक मुद्देरेल्वेतून केली जात होती तस्करी

इगतपुरी : तस्करीचे सोने रेल्वेने घेऊन जाणाऱ्या उल्हासनगरच्या तिघांना गीतांजली एक्स्प्रेसमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांकडून लॅपटॉप, घड्याळे, मोबाइल व विदेशी मद्याच्या बाटल्याही जप्त करºयात आल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दल आणि सीमा शुल्क विभागाने इगतपुरी रेल्वेस्थानकामध्ये ही कारवाई केली.
सायंकाळी मुंबईकडे जाणाºया गीतांजलीने अवैधरीत्या सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती इगतपुरी रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. इगतपुरी स्थानकात गाडी आल्यावर वातानुकूलित डब्यात बसलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेतले. या तिघांना कार्यलयात आणून सीमा शुल्क विभागाचे (कस्टम) सहायक आयुक्त राजेंद्र कुमार जैन यांच्यासमोर संशियत प्रवासी धीरज लालचंद अहुजा (२९) , हरिष कुकरेजा (४१), विनोद बलवानी (३७) सर्व रा. उल्हासनगर जिल्हा ठाणे यांची चौकशी करून बॅगची तपासणी करण्यात आली असता एका बॅगमध्ये ७५६ ग्रॅम वजनाचे २४ लाख ४३ हजार ६०० रु पयांचे सोने सापडले. याशिवाय महागडे तीन लॅपटॉप, ३ घड्याळे, १ मोबाईल, विदेशी मद्याच्या भरलेल्या ७ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी कस्टम कायद्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आर के पटेल, विशाल पाटील, गजानन जाधव, डी. एम.पालवे यांनी यशस्वी केली .
मध्य रेल्वेच्या गीतांजलीने नागपूरहून मुंबईला तस्करीचे सोने घेऊन जाणाºया तिघांना इगतपुरी रेल्वे सुरक्षा दलाने सापळा रचून इगतपुरी स्थानकात अटक केली आहे. या तिघांकडून ७५६ ग्रॅम वजनाचे सुमारे २५ लाख रु पयांच्या सोन्यास ह लॅपटॉप, मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Web Title: 25 lakhs gold worth Igatpuri seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.