आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:38 AM2018-02-16T00:38:34+5:302018-02-16T00:45:48+5:30

सटाणा : शैक्षणिक वर्ष २०१८ व २०१९ साठी शिक्षण हक्कअंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पालकांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती सटाण्यातील किलबिल इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या संगीता शुक्ल यांनी दिली आहे.

25 percent seats for students of economically weaker sections | आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा

Next
ठळक मुद्दे२५ टक्के आरक्षित जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू पालकांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार

सटाणा : शैक्षणिक वर्ष २०१८ व २०१९ साठी शिक्षण हक्कअंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पालकांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती सटाण्यातील किलबिल इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या संगीता शुक्ल यांनी दिली आहे.
शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, शासन नियमाप्रमाणे किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही २५ टक्के आरक्षित जागा आहेत. जिल्ह्यातील शाळांमध्ये सहा हजारांहून अधिक प्रवेशाच्या जागा आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०१८ व २०१९ या वर्षासाठी २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने होत असल्याचे प्राचार्या शुक्ल यांनी म्हटले आहे. आॅनलाइन प्रवेश फॉर्म भरण्यासाठी किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मदतकक्षाची स्थापना करण्यात आली असून, पालकांनी शाळेत येऊन कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्या संगीता शुक्ल यांनी केले आहे.हे आहेत बदल...एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दहा शाळांसाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्याची फक्त एकाच शाळेत लॉटरी लागेल. लॉटरीनंतर दिलेल्या मुदतीत प्रवेश घेतला नाही तर पुढील फेºयांतून प्रवेश मिळणार नाही. जे विद्यार्थी २०१७ व २०१८ मध्ये पहिलीमध्ये शिक्षण घेत आहे, ते पुढील वर्ष २०१८ व २०१९ मध्ये पहिलीत प्रवेश घेण्यास पात्र राहणार नाहीत. नर्सरीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण तर पहिलीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत पाच वर्षे आठ महिने पूर्ण असणे आवश्यक आहेत.

Web Title: 25 percent seats for students of economically weaker sections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.