मनमाडमध्ये २५ अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 09:56 PM2020-08-09T21:56:04+5:302020-08-10T00:26:27+5:30

मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून दिवसेंदिवस रु ग्णाची संख्या वाढत आहे. मनमाड शहरात कोरोनाचे २६६ रु ग्ण झाले असून सहा रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

25 positive reports in Manmad | मनमाडमध्ये २५ अहवाल पॉझिटिव्ह

मनमाडमध्ये २५ अहवाल पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देयेवल्यात एक रुग्ण

मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून दिवसेंदिवस रु ग्णाची संख्या वाढत आहे. मनमाड शहरात कोरोनाचे २६६ रु ग्ण झाले असून सहा रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरात कोरोनाचा सामूहिक संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०४ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मनमाड शहरातील लोकसंख्या बघता हे आकडे कमी असले तरी भविष्यात येथून कोरोनाचे रुग्ण अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनमाडला जवळपास एक लाख चाळीस हजाराच्यावर लोकसंख्या आहे. येथून सामूहिक संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.
येवल्यात एक रुग्ण
येवला : निमागव मढ येथील १९ वर्षीय तरूणाचा खासगी लॅबकडून अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या२५३ झाली असून आजपर्यंत २२८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.१९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या ६ आहेत. बाधितांपैकी नाशिक येथील रूग्णालयात तिघांवर, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्ष एक तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोघा रूग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

Web Title: 25 positive reports in Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.