विधवा पुनर्विवाहासाठी २५ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:48 AM2019-01-29T00:48:26+5:302019-01-29T00:48:43+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विधवा महिलेच्या पुनर्विवाहासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकलहरे : येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विधवा महिलेच्या पुनर्विवाहासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मोहिनी जाधव होत्या. पतीचे निधन झाल्याने उभे आयुष्य उपेक्षितपणाचे जिणे जगावे लागते, तर लग्न होत नसल्याने युवकही मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना घडतात. त्यातून सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत असते. त्यामुळे गावातील ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील त्यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा पुरोगामी निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. तसेच यासाठी महिला व बालकल्याणसाठी १० टक्के ग्रामनिधीतून मदत दिली जाणार आहे.
ग्रामसभेस उपसरपंच अशोक पवळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ होलिन, सुरेखा जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील त्यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. तसेच यासाठी महिला व बालकल्याणसाठी १० टक्के ग्रामनिधीतून मदत दिली जाणार आहे.