कुंदेवाडीच्या देवनदी बंधाऱ्यातून २५ हजार घनमीटर गाळाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:48 PM2019-01-19T17:48:12+5:302019-01-19T17:48:24+5:30

सिन्नर : युवामित्र आणि आमदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून तालुक्यातील कुंदेवाडी आता टंचाईमुक्त होण्यास मदत होणार आहे. परिसरातील देवनदीवरील बंधाºयातून गाळ उपसा करण्यात आल्याने यात दोन कोेटी ५० लाख लिटरने वाढणार असल्याची माहिती स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी दिली.

25 thousand cubic meter of puddle from Devundi Bond of Kundewadi | कुंदेवाडीच्या देवनदी बंधाऱ्यातून २५ हजार घनमीटर गाळाचा उपसा

कुंदेवाडीच्या देवनदी बंधाऱ्यातून २५ हजार घनमीटर गाळाचा उपसा

Next

सिन्नर : युवामित्र आणि आमदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून तालुक्यातील कुंदेवाडी आता टंचाईमुक्त होण्यास मदत होणार आहे. परिसरातील देवनदीवरील बंधाºयातून गाळ उपसा करण्यात आल्याने यात दोन कोेटी ५० लाख लिटरने वाढणार असल्याची माहिती स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी दिली.
गावातून जाणाºया देवनदीवरील बंधारा व नाल्यातील सुमारे २५ हजार घनमीटर गाळ आतापर्यंत काढण्यात आला. त्यामुळे सात एकर खडकाळ जमीन सुपीक झाली आहे. हा गाळ काढल्यामुळे दर वर्षी जानेवारीतच पाणीबाणीचा सामना करणाºया कुंदेवाडीकरांची पाणीटंचाई मुक्तता होणार आहे. आमदार वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली युवामित्र सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे. कुंदेवाडी येथील स्टाईसचे संचालक नामकर्ण आवारे आणि व्यवस्थापक कमलाकर पोटे यांची कुंदेवाडी गावची टंचाई दूर करण्यावर भर दिला आहे. सरपंच सविता पोटे व ग्रामस्थांनी लोकसहभाग दिल्याने हे काम पूर्ण झाले आहे. युवामित्रचे सुनील पोटे व प्रितम लोणारे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याने शेतकºयांनी पोकलॅँडच्या सहाय्याने उपसलेला गाळ स्वखर्चाने आपल्या शेतात वाहून टाकला आहे. गाळ काढल्याने देव नदीचे पात्र आता विस्तीर्ण दिसू लागले आहे. बंधाºयात साठणाºया पाण्याचा पाझर मोठ्या प्रमाणात होवून परिसरातील पाण्याची पातळी वाढण्याबरोबरच शेतकºयांच्या विहिरींनाही हे पाणी उतरणार असल्याने बागायती क्षेत्र वाढणार आहे.

Web Title: 25 thousand cubic meter of puddle from Devundi Bond of Kundewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी