२५ आदिवासी कुटुंबांची अतिक्र मणे केली उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:59 AM2019-01-04T00:59:25+5:302019-01-04T01:01:30+5:30
त्र्यंबकेश्वर : पठारवाडी व विनायक खिंड येथील येथील २५ आदिवासी रहिवाशांचे अतिक्र मण वनविभागाने जेसीबीने उध्वस्त करु न टाकले. ...
त्र्यंबकेश्वर : पठारवाडी व विनायक खिंड येथील येथील २५ आदिवासी रहिवाशांचे अतिक्र मण वनविभागाने जेसीबीने उध्वस्त करु न टाकले. त्यामुळे आदिवासी बांधव आपल्या मुलाबाळांसह उघड्यावर आले.
पठारवाडीला नागरी सुविधाच नसल्यामुळे मूलभूत सुविधा होईपर्यंत आम्हाला येथे राहू द्या,नंतर आम्ही स्वत:हून पठारवाडी येथे जाऊ असे अतिक्र मण केलेल्या ग्रामस्थांचे म्हणणे होते.पण त्यांचे म्हणणे ऐकून न घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी पठारवाडी येथे विनायक खिंडच्या ग्रामस्थांना स्थलांतराचा आदेश दिला होता. जिल्हाधिकाºयांना निवेदनजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात या रहिवाशांनी म्हटले आहे की, आनंदवाडी (नवीन अतिक्र मण केलेले) येथे तात्पुरते अतिक्र मण केवळ पाण्याअभावी करीत आहोत. पठारवाडी येथे हव्या असलेल्या मूलभूत व नागरी सुविधा देईपर्यंत आम्हाला येथे राहू द्या, अशी विनंती केली आहे. पठारवाडी येथे सुविधा झाल्यानंतर आम्हीच तेथे परत जाऊ असेही त्यांनी सांगितले.