कारागृहातून २५० कैद्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:45 PM2020-05-14T23:45:32+5:302020-05-14T23:46:09+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून कारागृहातील न्यायालयीन व शिक्षा लागलेल्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून गेल्या तीन दिवसांत २५० शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना वैयक्तिक अभिवचन रजा, पॅरोलवर व ४५ दिवसांसाठी सोडण्यात आले. त्यामध्ये पाच महिला कैद्यांचा समावेश आहे.

250 prisoners released from jail | कारागृहातून २५० कैद्यांची सुटका

कारागृहातून २५० कैद्यांची सुटका

Next
ठळक मुद्देउपाययोजना : पाच महिला बंदीचाही समावेश

नाशिकरोड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून कारागृहातील न्यायालयीन व शिक्षा लागलेल्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून गेल्या तीन दिवसांत २५० शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना वैयक्तिक अभिवचन रजा, पॅरोलवर व ४५ दिवसांसाठी सोडण्यात आले. त्यामध्ये पाच महिला कैद्यांचा समावेश आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहामध्ये न्यायालयीन व शिक्षा लागलेले तीन हजारांहून अधिक कैदी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या प्रारंभी न्यायालयीन कैद्यांना सोडण्याचा शासन विचार करीत होते. त्यानंतर राज्य शासनाकडून अटी-शर्तीवर न्यायालयीन व सात वर्षांपर्यंत शिक्षा लागलेल्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून गेल्या सोमवारपासून गुरु वारी सायंकाळपर्यंत चार दिवसांत जवळपास २५० शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची वैयक्तिक बंधपत्र म्हणजेच पॅरोलवर ४५ दिवसांसाठी सुटका करण्यात आली आहे. यामध्ये पाच महिला कैदीचा समावेश आहे.

या कैद्यांची सुटका नाही
ज्या कैद्यांवर विशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल असून, त्याची ते शिक्षा भोगत आहे. उदा. टाडा, मोक्का, बलात्कार, पोस्को, एमपीआयडी, देशाविरु द्ध कारवाई, शासकीय मालमत्तेचे नुकसान, बँक घोटाळा, जबरी चोरी, दरोडा, मोठी फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सोडण्यात येणार नसल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.

Web Title: 250 prisoners released from jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.