२५० पथदीपांनी उजळणार स्टाईस

By admin | Published: February 18, 2016 10:48 PM2016-02-18T22:48:11+5:302016-02-18T22:50:57+5:30

सिन्नर : कार्यक्षेत्रास संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रगतिपथावर

250 stylish style to light | २५० पथदीपांनी उजळणार स्टाईस

२५० पथदीपांनी उजळणार स्टाईस

Next

 सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या (स्टाईस) ४१० एकर क्षेत्रावर २५० पथदीप बसविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. औद्योगिक वसाहतीची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती स्टाईसचे संचालक नामकर्ण आवारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्टाईसच्या संचालक मंडळास कार्यभार स्वीकारून सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अध्यक्ष अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष पंडित लोंढे, संचालक प्रभाकर बडगुजर, सुनील कुंदे, अविनाश तांबे, विठ्ठल जपे, अनिल दळवी, व्यवस्थापक कमलाकर पोटे आदि यावेळी उपस्थित होते.
स्टाईसच्या संपूर्ण कार्यक्षेत्रास संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. २५० पथदीप बसविण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे स्टाईसमधील उद्योगांची सुरक्षितता मजबूत होणार असल्याचे आवारे यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतींमध्ये सकारात्मक चित्र निर्माण करून नवीन उद्योगांसाठी पूरक वातावरण देण्यासाठी स्टाईस प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रमोद महाजन किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत स्टाईसच्या कार्यालयात कामगारांसाठी मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामुळे उद्योजकांना जाणवणारा कुशल कामगारांचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे. औद्योगिक वसाहतीतील समस्या सोडविण्यासाठी ३७५ सदस्यांचा समावेश असलेल्या १३ समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. प्रत्येक कारखान्यातील व्यवस्थापकांनाही या समित्यांमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे निर्माण होऊ पाहणाऱ्या अडचणींवरही तत्काळ तोडगा निघत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: 250 stylish style to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.