2500 एलईडी बसविणार

By Admin | Published: March 25, 2017 10:45 PM2017-03-25T22:45:29+5:302017-03-25T22:45:50+5:30

सिन्नर : ऊर्जेची व वीजबिलांची बचत होण्याच्या दृष्टीने शहरात सुमारे अडीच हजार एलईडी बल्ब बीओटी तत्त्वावर बसविण्याचा निर्णय सिन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

2500 LED will be installed | 2500 एलईडी बसविणार

2500 एलईडी बसविणार

googlenewsNext

सिन्नर : ऊर्जेची व वीजबिलांची बचत होण्याच्या दृष्टीने शहरात सुमारे अडीच हजार एलईडी बल्ब बीओटी तत्त्वावर बसविण्याचा निर्णय सिन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.  नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. ऊर्जेची व वीज बिलाची बचत होण्याच्या दृष्टीने एलईडी बल्ब बसविणे गरजेचे असल्याचे सर्वांनी मान्य केले. एलईडी बल्ब बसविल्याने दरमहा दीड लाख रुपये वीज बिलांची बचत होण्याचा अंदाज आहे. आगामी तीन वर्षे त्याचा फायदा होईल.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून १४ व्या वित्त आयोगातून १७ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तथापि, शहरातील भौगोलिक परिस्थितीमुळे तळवाडी, गोंदेश्वर, भंडारवाडी येथे खडकाळ जमीन असल्याने सदर निधीतून ते काम शक्य नसल्याने या भागात वैयक्तिक शौचालय बांधण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेच्या निधीतून ५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे शंभर ते दीडशे कुटुंबियांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. त्यास पालिकेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालिकेतर्फे आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीचे बील दर सहा महिन्यातून एकदा पाठविण्यात येते. तथापि, प्रशासकीय सोयीसाठी व वसुलीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी पाणीपट्टीचे बील वर्षातून एकदा एक हजार दोनशे रुपये याप्रमाणे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगरपालिकेसाठी पाण्याचा टॅँकर खरेदी करणे, स्वच्छता कर, घनकचरा व्यवस्थापन कर, मैला व्यवस्थापन कर यांची पुनर्रचना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा करण्यात येवून त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीस उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, नगरसेवक विजय जाधव, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, शैलेश नाईक, बाळासाहेब उगले, गोविंद लोखंडे, रुपेश मुठे, श्रीकांत जाधव, नामदेव लोंढे, सुहास गोजरे, चित्रा लोंढे, सुजाता तेलंग, प्रतिभा नरोटे, सुजाता भगत, नलिनी गाढे, प्रणाली गोळेसर, ज्योती वामने, अलका बोडके, मल्लू पाबळे, संतोष शिंदे, मंगला शिंदे, गीता वरंदळ, मालती भोळे, निरुपमा शिंदे, प्रिती वायचळे, शीतल कानडी, विजया बर्डे, वासंती देशमुख, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास उपस्थित होते. (वार्ताहर)
 

Web Title: 2500 LED will be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.