शहरात २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 07:17 PM2020-08-09T19:17:24+5:302020-08-10T00:31:17+5:30

नाशिक : ‘मिशन झिरो’अंतर्गत गत पंधरवड्यापासून सुरू असलेल्या अभियानात आतापर्यंत तब्बल २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्टचे ध्येय पूर्ण करण्यात आले. या टेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत महानगरातील २७८० पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात यश आले आहे. त्यामुळे या बाधितांच्या माध्यमातून अजून पुढे होणारा प्रसार वेळीच रोखणे शक्य झाले आहे.

25,000 antigen tests in the city! | शहरात २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्ट !

शहरात २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्ट !

Next
ठळक मुद्देपुढाकार : ‘मिशन झिरो नाशिक’ अभियानास पंधरा दिवस पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘मिशन झिरो’अंतर्गत गत पंधरवड्यापासून सुरू असलेल्या अभियानात आतापर्यंत तब्बल २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्टचे ध्येय पूर्ण करण्यात आले. या टेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत महानगरातील २७८० पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात यश आले आहे. त्यामुळे या बाधितांच्या माध्यमातून अजून पुढे होणारा प्रसार वेळीच रोखणे शक्य झाले आहे.
नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन झिरो नाशिक’ या एकात्मिक कृती योजनेस पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. या अभियानांतर्गत रविवारपर्यंत २५०३३ अ‍ॅँटिजेन टेस्ट करून २७८० बाधितांना शोधण्यात यश आले आहे. लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने पॉझिटिव्ह रु ग्णांना हुडकून काढण्यात यश येत आहे. त्यामुळे उपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, त्यायोगे रु ग्णांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांना शारीरीक व मानसिक बळ देण्यात हे अभियान यशस्वी होत आहे. रविवारी केवळ रविवार कारंजा गणपती मंदिर या ठिकाणी तपासणी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. अन्य सर्व मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन निर्जंतुकीकरण करण्याकरिता रविवारी पाठवण्यात आल्याने आता पुन्हा सोमवारपासून कामकाजाला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. ‘मिशन झिरो नाशिक’मध्ये महानगरपालिकाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस आयुक्तालय, भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते यांच्या बरोबरीने सैफी अ‍ॅम्बुलन्स कॉर्पसचे सेवाभावी कार्यकर्ते, गुरु द्वारा नाशिकरोड, किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, एसकेडी इंटरनॅशनल स्कूल, व्हिजन अकॅडमी, साधना फाउंडेशन, मातोश्री ट्रॅव्हल्स, इस्पलियर स्कूल, डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निसिएन, शिक्षक, स्थानिक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अशा अनेक संस्था व व्यक्ती यांचे सहकार्य लाभत आहे.

२२५ जणांचे सांघिक कार्य
महानगरातील विविध भागांतून तब्बल २४ मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे हे कार्य केले जात आहे. त्यामुळेच अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा पुरवण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना व कार्यकर्त्यांना यश आले आहे. मिशन झिरो नाशिकसाठी महानगरातील २२५हून अधिक कर्मचारी व कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातूनच हे दैनंदिन जनसेवेचे कार्य पुढे नेणे शक्य होत असल्याचे भारतीय जैन संघटना आणि मिशन झिरोचे समन्वयक नंदकिशोर सांखला यांनी सांगितले.

Web Title: 25,000 antigen tests in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.