अकरावीच्या २५ हजार जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:35 PM2020-07-30T23:35:47+5:302020-07-31T01:30:34+5:30
नाशिक : महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार २५० जागा उपलब्ध असून, यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये ११ हजार ५५०, विनाअनुदानितमध्ये ८ हजार १६० व स्वयंअर्थसहाय्यमध्ये ५ हजार ३२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी रविवार (दि.२६)पासून आॅनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू संधी मिळणार असून, या अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया एक आॅगस्टपासून सुरू होणार आहे, तर दहावीचा निकाल लागल्यानंतरही अकरावीच्या प्रवेशाचा अर्जाचा भाग दोन भरण्याच्या वेळापत्रकाविषयी अनिश्चिता कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकरावी प्रवेशासाठी शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक महाविद्यालयाची भर पडली आहे. या महाविद्यालयातील वाढलेल्या जागांसह नाशिक शहरात एकूण २५ हजार २५० जागा अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या असून, यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या १० हजार १६०, वाणिज्यच्या ८ हजार ६००, कलाशाखेच्या ४ हजार ९१० व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (एचएसव्हीसी) १३६० जागांचा समावेश आहे. यापूर्वी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि.१५) सुरू होणार होती. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन झाल्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु, त्यानुसारही प्रवेशअर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही.
दुसऱ्यांदा सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशअर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया १ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. परंतु, यापूवी शिक्षण विभागाकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-२ भरता येणार असल्याचे सांगितले जात होते.बुधवारी (दि. २९) दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही अकरावीच्या प्रवेशअर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे भाग दोन भरण्याच्या वेळापत्रकाविषयी अनिश्चतता निर्माण झाली आहे. भाग १ मध्ये वैयक्तिक माहिती नोंदवायची आहे.
४भाग दोनमध्ये महाविद्यालयांचे पर्याय (पसंतीक्रम) नोंदविता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी वाढीव प्रवेशशुल्काचा भुर्दंड टाळण्यासाठी अनुदानित महाविद्यालयांमधील जागांचा पर्याय निवडण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
अनुदानित, विनाअनुदानित जागाजागांचा प्रकार कला वाणिज्य विज्ञान एचसीव्हीसी
अनुदानित ३३९० ३४८० ३३२० १३६०
विनाअनुदानित १००० ३४८० ३६८० ००००
स्वयंअर्थसहाय्य ५२० १६४० ३१६० ००००
शाखानिहाय उपलब्ध जागा शाखा जागा
कला ४९१०
वाणिज्य ८६००
विज्ञान १०१६०
एचसीव्हीसी १३६०