दहिकुटे- बोरी अंबेदरी प्रकल्पासाठी २५.२४ कोटींना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:15 AM2021-03-26T04:15:20+5:302021-03-26T04:15:20+5:30
तालुक्यातील या प्रकल्पास शासनाने दिलेल्या मंजुरीनंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित संबंधित विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी बाजार ...
तालुक्यातील या प्रकल्पास शासनाने दिलेल्या मंजुरीनंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित संबंधित विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव उपस्थित होते. खडकाळ जमिनीत पाणीगळतीच्या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणून लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीस शासनाने प्रथमच मंजुरी दिली असून, या प्रकल्पाचे काम करण्यापूर्वी सर्व तांत्रिक बाबी तपासून अभ्यासपूर्ण नियोजन करण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.
..................................
दहिकुटे व बोरी अंबेदरी प्रकल्पाला कृषी विभागाचीही जोड राहणार असून कृषी व पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेततळे उभारण्याची मोहीम राबविण्यात यावी, जुन्या पोटचाऱ्या तत्काळ मोकळ्या करण्यात याव्यात, शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचेल असे सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जुन्या धरणांचा पाईपबंद कालव्याचा प्रकल्प प्रथमच राबविण्यात येत असून, या नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या अनुषंगाने राज्यातील जुन्या प्रकल्पांचेही सर्वेक्षण करण्यात येईल. अशा प्रकल्पांवरील देखभाल-दुरुस्तीचा खर्च मर्यादित राहण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा आभ्यास करून सर्वसमावेशक अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही भुसे यांनी दिले.