शहरात एकाच दिवसात २६ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:29 AM2020-05-30T00:29:56+5:302020-05-30T00:30:57+5:30

आठ दिवसांत नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर पोहोचल्यानंतरदेखील आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी (दि.२९) पुन्हा दिवसभरात २६ रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १७८ झाली आहे. शहरात बाधितांच्या संपर्कातील अन्य असे आणखी काही अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे.

26 affected in a single day in the city | शहरात एकाच दिवसात २६ बाधित

शहरात एकाच दिवसात २६ बाधित

Next
ठळक मुद्देग्राफ वाढताच : एकूण संख्या १७८ वर, नाशिककरांच्या चिंतेत वाढ

नाशिक : आठ दिवसांत नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर पोहोचल्यानंतरदेखील आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी (दि.२९) पुन्हा दिवसभरात २६ रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १७८ झाली आहे. शहरात बाधितांच्या संपर्कातील अन्य असे आणखी काही अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे.
शहरातील वाढत्या रुग्ण संख्येने सध्या मालेगावनंतर आता नाशिक शहर हॉटस्पॉट ठरले आहे. गुरुवारी (दि.२८) शहरात १४ बाधित आढळले होते. शुक्र वारी (दि.२९) शहरात नऊ रुग्ण आढळले. यात सिडकोतील साईबाबानगर येथील ४५ वर्षीय २६ मे रोजी त्रास होत असल्याने सातपूर येथील ईएसआय रु ग्णालयात तपासणीसाठी गेली होती. या महिलेच्या घसास्त्रावाचे नमुने घेतल्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर जुने नाशिक प्रमोदगल्ली येथील २१ वर्षीय युवकाचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जुने नाशिकमधील कमोदगल्लीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे व गणेशनगर येथील एक रहिवासी तसेच द्वारका परिसरातील ७० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मालेगाव येथे कार्यरत असलेल्या, परंतु नाशिकमध्ये वास्तव्य असलेल्या पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पंचवटीत क्र ांतिनगर येथील बाजार समितीत काम करणाऱ्या एका रुग्णाचा अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता, आता त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंचवटीतील गणेश वाडी येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाल असून, त्याच्यावर सध्या खासगी रु ग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंचवटीतच रामवाडी येथील सीताराम कॉलनीतील ३१ वर्षीय रहिवासी मुंबईहून कंपनीच्या कामानिमित्त नाशिकला आलेला होता. तोही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. महालक्ष्मी थिएटर येथील लोकसहकारनगर येथील रु ग्णाच्या संपर्कातील व त्यांच्या कुटुंबातील १६ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सिन्नर फाटा येथील २६ वर्षीय रहिवासी हा नातेवाइकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्याच्यावर सिन्नरमध्ये उपचार सुरू आहेत.
रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात शहरात १७ रुग्ण आढळले असून, यात पेठरोड येथील राहुलवाडी, जुने नाशिक (कथडा) तसेच सातपूर अंबड लिंकरोड येथे प्रत्येकी १, दीपालीनगर येथे ४, वडाळा शिवार आयटी पार्क सोसायटी परिसरात ७ तर नाईकवाडीपुरा येथे ३ रुग्ण आढळले.

Web Title: 26 affected in a single day in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.