वावी विकास संस्थेत १३ जागांसाठी २६ उमेदवार रिग्ांणात

By admin | Published: August 21, 2016 12:45 AM2016-08-21T00:45:15+5:302016-08-21T00:49:25+5:30

चुरशीची निवडणूक : १२ जणांची माघार; दोन पॅनलमध्ये लढत

26 candidate candidates for 13 seats in Vavi Vikas Sanstha | वावी विकास संस्थेत १३ जागांसाठी २६ उमेदवार रिग्ांणात

वावी विकास संस्थेत १३ जागांसाठी २६ उमेदवार रिग्ांणात

Next

सिन्नर : तालुक्यातील वावी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व उपसरपंच विजय काटे यांच्या सत्ताधारी गटाच्या विरोधात सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठलराव राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. काटे व राजेभोसले या दोन परस्परविरोधी पॅनलमध्ये आमने-सामने चुरशीची लढत रंगणार
आहे.
विकास संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत दोघांचे अर्ज अवैध ठरले होते. ३८ उमेदवारांपैकी माघारीच्या शेवटच्या दिवशी १२ जणांनी
माघार घेतली. त्यामुळे १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी
सुरेखा वाजे, मारुती घेगडमल, जगन्नाथ रसाळ, रामनाथ गलांडे, भीमराव काटे, संदीप भोसले, रतनबाई ताजणे, अशोक
मालपाणी, सदाशिव गोराणे, दत्तात्रय नवले, दिनकर वेलजाळी व महम्मदरफीक इनामदार यांनी माघार घेतली.
महिला राखीव गटात दोन जागांसाठी मंदा भागवत वैराळ, कल्पलता कारभारी वेलजाळी, यमुनाबाई पांडुरंग नवले व ताराबाई कचरु शिंदे यांच्यात लढत होत आहे. इतर मागास प्रवर्गात संजय रामनाथ वेलजाळी व ज्ञानेश्वर पंढरीनाथ गलांडे यांच्यात समोरासमोर सामना होत आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती गटात सोमनाथ केदू कांदळकर व जनार्दन भानुदास रहाटळ यांच्यात लढत होत आहे. अनुसूचित जाती व जमाती गटात नवनाथ तुकाराम घेगडमल व रामदास मल्हारी घेगडमल आमनेसामने आहेत.
५३८ सभासद संख्या असलेल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी रविवार (दि. २८) रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर ताबडतोब मतमोजणी केली जाणार आहे. माघारीपूर्वीच दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला होता. (वार्ताहर)

Web Title: 26 candidate candidates for 13 seats in Vavi Vikas Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.