बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांमध्ये सलोख्यासाठी नरेडकोच्या राज्यात 26 समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:04 PM2019-11-24T18:04:20+5:302019-11-24T18:06:56+5:30

महारेरा प्राधिकरणाकडून बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यामध्ये सलोखा व समन्वय निर्माण करण्यासाठी राज्यभर २६ सलोखा (कौन्सिलेटरी) समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात प्र्रामुख्याने मुंबईत ८, पुणे ६ तसेच नाशिककरिता ३ व उर्वरित महाराष्ट्रासाठी ९ याप्रकारे समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहे. या समितीत नरेडको नाशिकच्या वतीने अविनाश शिरोडे, राजन दर्यानी, मोहन रानडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती नरेडकोतर्फे देण्यात आली आहे.

26 Committees in the state of Naredco for harmony between builders and consumers | बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांमध्ये सलोख्यासाठी नरेडकोच्या राज्यात 26 समित्या

बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांमध्ये सलोख्यासाठी नरेडकोच्या राज्यात 26 समित्या

Next
ठळक मुद्देनरेडकोच्या राज्याच 26 सलोखा समित्या सलोखा समित्या राखणार व्यावसाय ग्राहकांमध्ये समन्वय

नाशिक: महारेरा प्राधिकरणाकडून बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यामध्ये सलोखा व समन्वय निर्माण करण्यासाठी राज्यभर २६ सलोखा (कौन्सिलेटरी) समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात प्र्रामुख्याने मुंबईत ८, पुणे ६ तसेच नाशिककरिता ३ व उर्वरित महाराष्ट्रासाठी ९ याप्रकारे समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहे. या समितीत नरेडको नाशिकच्या वतीने अविनाश शिरोडे, राजन दर्यानी, मोहन रानडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती नरेडकोतर्फे देण्यात आली आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने अर्थात महरेरा यांनी दिनांक ११ आॅक्टोबर २०१९ रोजी काढलेल्या प्ररिपत्रकान्वये बांधकाम व्यावसायिकांना अधिकृत संस्थेचे सभासदत्व घेणे बंधनकारक, क्रमप्राप्त केले असून महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने नरेडकोला एसआरओ (सेल्फ-रेग्युलेटरी संस्था) म्हणून मान्यता दिल्याची माहिती नरेडकोच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.  संपूर्ण देशामध्ये बांधकाम व्यावसायिक संघटनेस अश्या प्रकारची मान्यता मिळालेली नरेडको हि प्रथम संस्था आहे. महरेराच्या निर्णयाने एकलपणाने व्यवसाय करणाऱ्या संबंधित वर्गास या मूलभूत प्रवाहात सामावून घेतले जाणार आहे, नरेडकोला एसआरओ (सेल्फ-रेग्युलेटरी संस्था) या अन्वये अशा प्रकारे बांधकाम व्यवसाय करणाऱ्या वर्गास प्रोजेक्ट मेम्बरशिप व अधिकृत मेम्बरशिप यान्वये संगठीत केले जाणार आहे यामुळे संपूर्ण व्यवसायास व्यवसायभिमुखता लाभणार असल्याचे मत नरेडकोच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

Web Title: 26 Committees in the state of Naredco for harmony between builders and consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.