ओझर येथे आढळले २६ कोरोना बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 00:51 IST2021-04-11T20:33:29+5:302021-04-12T00:51:31+5:30
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात रविवारी २६ रुग्ण कोरोना बाधित आढळले. आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २६१३ झाली आहे. पैकी ४८ जणांचा म्रुत्यू झाला असुन १८४५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ओझर येथे आढळले २६ कोरोना बाधित रुग्ण
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात रविवारी २६ रुग्ण कोरोना बाधित आढळले. आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २६१३ झाली आहे. पैकी ४८ जणांचा म्रुत्यू झाला असुन १८४५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ओझर सह परिसरातील २६ रुग्णाचा अहवाल आज कोरोना बाधित आला आहे त्यामध्ये ओझरटाऊनशिप मधील ७ रुग्णांचा, गायकवाड गल्ली १, सायखेडा फाटा १, स्वामी समर्थ नगर १, सिन्नरकर टाऊन ६, अेअर फोर्स १, ओझर गाव १, दिक्षी १, जिव्हाळे व दत्तनगर मधील ३, रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण २६१३ झाली आहे. पैकी ४८ कोरोना बाधितांचा म्रुत्यू झाला १८४५ रुग्ण बरे झाले असुन ७२० रुग्णावर उपचार सुरू आहे पैकी १२२ रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू असुन ५९८ रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या १२९८ झाली असुन ६५८ झोन पूर्ण झाले आहेत आता अँक्टिव्ह झोन ६४० आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ओझर परिसरामध्ये आता रोजच कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी तसेच होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे बाहेर फिरू नये असे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओझर सह परिसरातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे सर्वानी मास्क,सँनिटाईझर , सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे आरोग्य अधिकारी डाँ.वैशाली कदम ,डा. अक्षय तारगे, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.