लासलगावजवळ २६ शेतमजूरांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 06:38 PM2018-10-18T18:38:27+5:302018-10-18T18:38:38+5:30
पाचोरे येथील बाळासाहेब उगलमुगले यांच्या शेतावर काम करणाऱ्या २६ शेतमजूरांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजरीची भाकरी व दोडक्याची भाजी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली.
Next
लासलगाव: पाचोरे येथील बाळासाहेब उगलमुगले यांच्या शेतावर काम करणाऱ्या २६ शेतमजूरांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजरीची भाकरी व दोडक्याची भाजी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली.त्यांना उलट्या सुरू झाल्या. विषबाधेनंतर या मजुरांना तातडीने ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ सूर्यवंशी व डॉ.आहिरे यांनी उपचार केले.सर्वांची तब्येत सुधारत आहे .हे सर्वजण सुरगाणा, पेठ तालुक्यातील आहेत.